झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची आणि जोडीला परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं कि नेहाला देखील तिचं यशवर प्रेम असल्याचं जाणवतंय. पण तिने अजून हि गोष्ट कबूल केली नाहीये.